शुक्रवार, 29 जून 2018

बायको

💁 बायको जर नसेल तर
राजवाडा पण सुना आहे
बायकोला नावं ठेवणे हा 🙅‍
खरंच गंभीर गुन्हा आहे ! 🙅

💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय
🍃 पानही हालत नाही...
घरातलं कोणतंच सुख
बायको शिवाय फुलत नाही !💃

💁 नोकरी अन पगाराशिवाय
नवऱ्याजवळ आहे काय?🙆
तुलनाच जर केली तर
सांगा, तुम्हाला येतं काय?🙇

💁 स्वच्छ, सुंदर,पवित्र घर 🏡
बायकोमुळेच असतं...
नवरा नावाचं विचित्र माणूस
तिलाच हसत बसतं !

वय कमी असून सुद्धा
बायको समजदार असते..👩👱
बायकोपेक्षा नवऱ्याचे वय👴👨
म्हणूनच जास्त असते !

💁तिचा दोष काय तर म्हणे
चांगल्या सवयी लावते !
कुटुंबाच्या कल्याणासाठी🏃
दिवस रात्र धावते !

🙅 चिडत असेल अधून मधून
सहनशीलता संपल्यावर;
तुम्हीच सांगा काय होणार
चोवीस तास जुंपल्यावर ?

बायकोची टिंगल करून
फिदी फिदी हसू नका..😁
तिच्या यादीत मूर्ख स्थानी
नंबर एक वर बसू नका...🙇

💁बायको म्हणजे अंगणातला
प्राजक्ताचा सडा !🌸🌼🌺
बायको म्हणजे पवित्र असा
अमृताचा घडा !⚱

बायको म्हणजे सप्तरंगी🌈
इंद्रधनुष्य घरातलं !
देवासाठी गायलेलं
भजन गोड स्वरातलं !🎶

🙎नवरोजी 💁बायकोकडे
माणूस म्हणून पहा..
तिचं मन जपण्यासाठी
थोडं शांत रहा..😷🙅‍

कधीतरी कौतुकाचे
दोन शब्द बोलावे🙋
तिच्या वाट्याचे एखादं कामं तरी
आनंदाने झेलावे !🙆

👌🏻सर्व स्त्रियांना समर्पित👌🏻

रविवार, 10 जून 2018

सिद्ध मन्त्र साधना

ॐ नमो सिद्धाय सर्व अरिष्ट निवारनाय
सर्व कार्य सिद्ध कराय ॐ सिद्धाय नमः

ॐ सिद्ध गणेशाय नमः
ॐ सिद्ध सरस्वती माताय नमः
ॐ सिद्धेश्वराय नमः
ॐ सिद्धेश्वरी माताय नमः
ॐ सिद्ध विष्णु देवाय नमः
ॐ सिद्ध महालक्ष्मी माताय नमः
ॐ सिद्ध दत्तात्रेयाय नमः
ॐ सिद्ध गोरक्षनाथाय नमः
ॐ सिद्ध स्वामी हरदासाय नमः
ॐ सिद्ध गुरुदेवाय नमः
ॐ सिद्धाय नमः

ॐ नमो सिद्धाय सर्व अरिष्ट निवारनाय
सर्व कार्य सिद्ध कराय ॐ सिद्धाय नमः

ॐ नमो सिद्धाय सर्व समर्थाय
संसार सर्व दुःख क्षय कराय
सत्व गुण आत्मबल दायकाय, मनो वांछित फल प्रदायकाय
ॐ सिद्ध सिद्धेश्वराय नमः

सिद्ध सिद्धेश्वर शांति दायक तू शांतिदायक तू
सुख कारक सिद्ध विघ्न हर तू सिद्ध विघ्न हर तू
सिद्धियों के ईश्वर सिद्धेश्वर तू सिद्धेश्वर तू
रिद्धि सिद्धि दायक सिद्ध गुरु तू सिद्ध गुरु तू
श्रद्धा भक्ति दायक सिद्ध साईं तू सिद्ध साई तू
कृपा छत्र दाता सिद्ध गोरक्ष तू सिद्ध गोरक्ष तू
सिद्ध सिद्धेश्वर शांति दायक तू शांतिदायक तू

ॐ शांति शांति शांति

सद्गुरु

[10/06, 1:49 PM] Vaishnav Maharaj: सद्गुरु वांचोनि सापडेना सोय
धरावे ते पाय आधी आधी
आपना सारिखे करिती तात्काळ
नाही काळ वेळ तया लागी
लोह परिसा ची न साहे उपमा
सद्गुरु महिमा अगाधची
तुका म्हणे कैसे आंधलें है जन
गेले विसरून खऱ्या देवा
[10/06, 1:52 PM] Vaishnav Maharaj: दु:खाने जर्जर झालेल्या संसारी जीवाच्या चित्तात शांती व आनंदाची अमृतधारा सिंचन करण्यासाठीच श्री सद्गुरूंची आवश्यकता आहे. आनंद प्राप्त करून घेतला तर जगात सर्वत्र आनंदाचाच अनुभव येईल आणि हेच ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूंकडे जायचे असते
[10/06, 1:53 PM] Vaishnav Maharaj: संसाररूपी चिखलाच्या डबक्यात रात्रंदिवस बुडलेला जीव असतो, त्यातून वर येण्याची त्याची इच्छा आहे, परंतु अंगात साहस व शक्ती कमी आहे. चित्तात ज्ञानसूर्याचा उदय करून नित्यानंदमय सुख-दु:खरहित ब्रह्मस्वरूपात जीवाला चिरकाल प्रस्थापित करील, तर सद्गुरूरूप भगवत्शक्तीच्या विकासकेंद्राचे काय प्रयोजन आहे, असा प्रश्नच मनात उठणार नाही.
गुरु तेथे ज्ञान। ज्ञानी आत्मदर्शन।।
दर्शनी समाधान। आधी जैसे।।
[10/06, 1:56 PM] Vaishnav Maharaj: गुरुविषयी इतक प्रेम पाहिजे की त्यांची आठवण येताच डोळे बन्द व्हावेत, भरून याव, त्यानी आपल मानल, जवळ घेतला म्हणून धन्य व्हाव, चित्त स्थिर होऊन समाधि कड़े वाटचाल व्हावी.
[10/06, 2:01 PM] Vaishnav Maharaj: गुरूचे आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणे हे होय. हे मार्गदर्शन घेऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरूचे पाय धरावयाचे असतात. परमार्थात श्रवण व सद्गुरू यांना फार महत्त्व आहे. सद्गुरूंशिवाय गती नाही, तर श्रवण हा परमार्थाचा पायाच आहे. सद्गुरू मुखातून शुद्ध श्रवण घडल्याशिवाय साधकाच्या अंत:करणात नामाची गोडी निर्माणच होत नाही.
‘आर्धा देवासी ओळखावे। मग तयांचे भजन करावे।
अखंड ध्यानाचे धरावे। पुरुषोत्तमाचे।।’
तात्पर्य सद्गुरूच्या मुखातून जे शुद्ध श्रवण घडते, त्याने साधकाला ज्ञान मिळते व देवाची ओळख होते. म्हणूनच एकनाथ महाराज सांगतात,
*‘सद्गुरू वाचोनि नाम न ये हातां। साधने साधिता कोटि जाणा।।*

शरणागति पाहिजे, हुशारी नाही. जे स्वतः आंकड़े मोड़ करायला लागतात, गुरुबाबत अंदाज बाँधायला लागतात, त्याची शरणागति कधीच होत नाही.  आपले भांडे रिकामें असल्या शिवाय त्यात उपदेश शिरतच नाही. बोध होत नांही. बोधा शिवाय काही च प्राप्त होत नाही.

*संतांसी शरण गेलिया वांचोनी। एका जनार्दनी न कळे नाम।।’*
म्हणून श्री सद्गुरूंना आपण शरण गेल्यावर ते प्रथम आपल्याला जागे करतात व नंतर आपल्या जवळच असलेल्या देवाची जागा प्रत्यक्ष दाखवितात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,
‘तुका करी जागा। नको चाचपू वाऊगा।।
आहेसी तु अगां। अंगी डोळे उघडी।।’