मंगलवार, 18 जून 2019

सोमरस और शराब ?

धर्म-अध्यात्म की किताबों में हम जगह जगह पर नशे की निंदा या बुराई सुनते हैं, तब धर्म के रचनाकर और देवता कैसे शराब पी सकते हैं? ऋग्वेद में शराब की घोर निंदा करते हुए कहा गया - "हृत्सु पीतासो युध्यन्ते दुर्मदासो न सुरायाम्" यानी की सुरापान करने या नशीले पदार्थों को पीने वाले अक्सर युद्ध, मार-पिटाई या उत्पात मचाया करते हैं।

ऋग्वेद मैं ही कहा गया है - "यह निचोड़ा हुआ शुद्ध दधिमिश्रित सोमरस, सोमपान की प्रबल इच्छा रखने वाले इंद्र देव को प्राप्त हो।। (ऋग्वेद-1/5/5)" "हे वायुदेव यह निचोड़ा हुआ सोमरस तीखा होने के कारण दुग्ध में मिश्रित करके तैयार किया गया है। आइए और इसका पान कीजिए।। (ऋग्वेद-1/23/1)

ऋग्वेद में सोम में दही और दूध को मिलाने की बात कही गई है, जबकि यह सभी जानते हैं कि शराब में दूध और दही नहीं मिलाया जा सकता। भांग में दूध तो मिलाया जा सकता है लेकिन दही नहीं, लेकिन यहां यह एक ऐसे पदार्थ का वर्णन किया जा रहा है जिसमें दही भी मिलाया जा सकता है। इसलिए यह बात का स्पष्ट हो जाती है कि सोमरस जो भी हो लेकिन वह शराब या भांग तो कतई नहीं थी और जिससे नशा भी नहीं होता था

सोमरस की जगह पंचामृत

आजकल सोमरस की जगह पंचामृत ने ले ली है, जो सोम की प्रतीति-भर है। कुछ प्राचीन धर्मग्रंथों में देवताओं को सोम न अर्पित कर पाने की स्तिथि में कोई और चीज अर्पित करने पर क्षमा- याचना करने के मंत्र भी लिखे हैं

वैदिक ऋषियों का चमत्कारी आविष्कार सोमरस एक ऐसा पदार्थ है, जो संजीवनी की तरह कार्य करता है। यह जहां व्यक्ति की जवानी बरकरार रखता है वहीं यह पूर्ण सात्विक, अत्यंत बलवर्धक, आयुवर्धक व भोजन-विष के प्रभाव को नष्ट करने वाली औषधि है।

कण्व ऋषियों ने मानवों पर सोम का प्रभाव इस प्रकार बतलाया है- 'यह शरीर की रक्षा करता है, दुर्घटना से बचाता है, रोग दूर करता है, विपत्तियों को भगाता है, आनंद और आराम देता है, *आयु बढ़ाता है और संपत्ति का संवर्द्धन करता है।* इसके अलावा यह विद्वेषों से बचाता है, शत्रुओं के क्रोध और द्वेष से रक्षा करता है,

मंगलवार, 4 जून 2019

सोमरस ते दारू प्रवास

सोमरस ते दारू; एक प्रवास

अनेकदा सोमरसाची तुलना दारूशी केली जाते. प्राचीन काळात देव-देवता सोमरस प्राशन करत असल्याचे संदर्भ आढळतात. परंतु, सोमरस आणि दारूत साधर्म्य असल्याचे सांगत पिणा-यानी आपला मार्ग मोकळा केलाय. शिवाय,मद्यपानाचं देव-देवतांशी तादात्म्य जोडून वैध असल्याचा आविर्भावही त्यांच्यात दिसून येतो. वैदिक काळात पंचशुद्धीला अधिक महत्व दिलं जात होतं. चारित्र्य संपन्नतेला प्राधान्य दिलं जायचं. त्यामुळे उन्माद आणणारं पेय त्या काळात सेवन केलं जातं होतं का? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. म्हणूनच सोमरस नक्की काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.



धार्मिक ग्रंथांमधून मद्यपानाची, उन्माद आणणा-या पदार्थाच्या सेवनाची सर्वत्र निंदाचं करण्यात आली आहे. वेदांमध्ये सोमरसाला अनन्य साधारण महत्व आहे. सोम एक औषधी वनस्पती असल्याचं वेद-पुराणातील उल्लेखांमधून स्पष्ट होते. सोम या वनस्पतीला चमत्कारी वनौषधी असंही संबोधलं जातं.

ऋग्वेदामध्ये मादक पदार्थाविषयी काय म्हटलंय...

।।हृत्सु पीतासो युध्यन्ते दुर्मदासो न सुरायाम्।।

सुरा म्हणजे नशा आणणारा पदार्थ. सुरापान करणारे किंवा मद्यपान करणारे नेहमीच भांडण, मारामारी आणि हिंसा करतात.  

ऋग्वेदामध्ये सोमरसाविषयी काय म्हटलंय...

।।शतं वा य: शुचीनां सहस्रं वा समाशिराम्। एदुनिम्नं न रीयते।। (ऋग्वेद-1/30/2)

दही आणि दुग्ध मिश्रित सोमरसाचे अनेक घडे इंद्रदेवाला प्राप्त होवोत, असं आवाहन करण्यात आलंय. सोमरसात दही-दूध मिश्रित करण्याचं म्हटलंय. दारूत दूध-दही घातले जात नाही, हे सर्वश्रुत आहे. भांग दूध घालून पिण्यात येते. पण त्यात दही घातल्याचे आजवर तरी ऐकण्यात आले नाही.

।।औषधि: सोम: सुनोते: पदेनमभिशुण्वन्ति।- निरुक्त शास्त्र (11-2-2)

सोम एक औषधी आहे. ज्याला कुटून आणि दळून त्याचा रस काढण्यात येत असे. दुग्ध मिश्रित सोम म्हणजे ‘गवशिरम्’ तर दही मिश्रित सोम म्हणजे ‘दध्यशिरम्’ बनवले जात होते. शुद्ध तूप आणि मध घालूनही सोमरस तयार करण्यात येत असे. याचा अर्थ असा की, मदिरा, सुरा, भांग किंवा दारू या कशातही दही, मध आणि तूप घालण्यात येत नाही. या उलट सोम, दुध, दही, तूप आणि मध यांच्या मिश्रणातून सोमरस तयार करण्यात येत असे. म्हणजे, सोमरस हे दारू किंवा भांग असा मादक-उन्माद आणणारा हानिकारक पदार्थ नव्हे, हे लक्षात घ्यायला हवं. आता दारू ही हानिकारक आहे, असं कोणं म्हणतो? असा वाद निर्माण होऊ शकतो. पण किमान भारतात दारूमुळे होणारे दुष्परिणाम पाहता, 'हानिकारक' हा शब्दप्रयोग याग्य ठरावा. 

ऋग्वेदातील एक संदर्भानूसार...

देव-दानवांना स्फुर्ती आणि प्रेरणा देणारा रस, असं सोमरसाचं वैशिष्ट्य होतं. इंद्र सोमरसाचं प्राशन करून अधिक पराक्रमी बनतो. म्हणून इंद्रदेवाला सोमरस अर्पण करतात.

"स्वादुष्किलायं मधुमां उतायम्तीव्र: किलायं रसवां उतायम। उतोन्वस्य पपिवांसमिन्द्रमन कश्चन सहत आहवेषु"

म्हणजे सोम अतिशय स्वादिष्ट, मधुर आणि रसाळ आहे. सोमरसपान करणारा बलवान आणि अपराजीत बनतो. तारूण्य बहाल करणारा, सात्विक, अत्यंत बलवर्धक, आयुवर्धक, अन्नदोषाचा प्रभाव नष्ट करणारा असा हा ‘सोमरस’.शरीर रक्षण, आरोग्य प्रदान करणारा, संकटांना दूर पळविणारा, बलशाली, आनंद देणारा, संपत्ती संवर्धन करणारा, ऋषीत्व आणि अमरत्व प्रदान करणा-या सोमरसाचे असे अनेक गुणधर्म कण्व ऋषींनी सांगितले आहेत. 

सोम वनस्पतीची संजिवनी वनस्पतीशीही तुलना करण्यात आली आहे. ऋग्वेदानूसार सोम वनस्पतीच्या उत्पत्तीचे दोन प्रमुख स्थान सांगितले आहेत. एक स्वर्ग आणि दुरसे पार्थिव पर्वत. अर्थात, पृथ्वीवरील पर्वत श्रृंखला. सोम अग्नीप्रमाणेच स्वर्गातून पृथ्वीवर आल्याचं ऋग्वेदात सांगण्यात आलयं. मुजवंत पर्वत (गांधार-कम्बोज प्रदेश) हे सोम वनस्पतीचे पृथ्वीवरील पार्थिव स्थान. (ऋग्वेद अध्याय सोम मंडल- 4, 5, 6) वेदांमध्ये वर्णित सोमरसची वनस्पती अफगणिस्तानातील टेकड्यांवर आढळली आहे. काही वर्षांपूर्वी ईराणमध्ये काही लोक इंफेड्रा नामक झाडाची तुलना सोम वनस्पतीशी करत असतं. तुर्कमेनिस्तानमधील तुगलक-21 मंदिर परिसरात मातीच्या काही भांड्यांमध्ये इंफेड्रा झाडांच्या लहान-लहान फांद्या आढळल्या. या भांड्यांचा उपयोग पूर्वी सोमरसाच्या अधिष्ठानाकरीता करण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते. या पुराव्यांसंदर्भात पुढे संशोधनही सुरू आहे.



सोमविषयी काही पौराणिक कथाही प्रचलित आहेत. वराह पुराणात सोमच्या उत्पत्तीचं वर्णन करण्यात आले आहे. सोम दक्षाच्या शापामुळे क्षय पावून लुप्त झाला. त्याच्या नष्ट होण्याने देव, मनुष्य, पशु, वृक्ष विषेशत: औषधी वनस्पती क्षीण झाल्या. त्यावर चिंतित देव-देवतांना विष्णूने समुद्र मंथनाचा पर्याय सुचविला. समुद्र मंथनातून पुन्हा सोमची उत्पत्ती झाली. वरील दाखले विचारात घेता, सोमरसाची तुलना दारूशी करणं संयुक्तिक ठरणार नाही. सोमरसामुळे निरोगी, बलवान स्फुर्ती आणि प्रेरणा देणारा, सात्विकता आणि अमरत्व प्राप्त करून देणारा हा सर आध्यात्मिक आणि व्यवहारिक अर्थाने उपयोगी ठरणारा आहे.

सोमरस म्हणजे दारू नव्हे?

अनेकदा ऐकण्यात येते की, प्राचीन काळी प्रचलीत असलेले सोमरस हे दारू किंवा मद्याचेच दुसरे नाव आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की वैदिक काळात आचार विचारांची शुद्धता काटेकोरपणे पाळली जात असे. ज्या काळी धर्म अध्यात्माने इतकी उंची गाठली त्या काळात लोक दारूसारख्या व्यसनात अडकलेले असतील, हे शक्य वाटत नाही. कारण धर्म आणि अध्यात्माशी संबंधीत ग्रंथांमध्ये व्यसन किंवा नशा करण्याला पाप संबोधले आहे. सोमरस म्हणजे दारू किंवा मद्य नव्हे, हे सिद्ध करणारे काही पुरावे पाहा...मन्त्र: सुतपात्रे ............  दध्याशिर: ।। (ऋग्वेद-1/5/5)
अर्थ. हे शुद्ध दूधमिश्रित सोमरस, सोमपानाची तीव्र इच्छा बाळगणार-या इंद्रदेवाला प्राप्त होऊ दे.
मन्त्र: तीव्रा: ....... तान्पिब ।। (ऋग्वेद-1/23/1)
अर्थ.  हे वायूदेव सोमरस फारच तिखट असल्यामुळे दूध मिसळून तयार केले आहे. आपण हे प्राशन करूया.
मन्त्र: शतं वा य: शुचीनां सहस्रं वा समाशिराम्  ।  एदुनिम्नं न रीयते  ।। (ऋग्वेद-1/30/2)
उताराच्या दिशेने वाहणार-या पाण्याप्रमाणे प्रवाहित होणार-या सोमरसात शेकडो घागरी दूध मिसळून इंद्रदेवाला प्राप्त होऊ दे.
या मंत्रांवरून कळते की सोमरसात दही, दूध मिसळण्यासंबंधी वर्णन आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की दारूत दूध किंवा दही मिसळत नसतात. यावून स्पष्ट होते की सोमरस हे मद्य किंवा दारूसारखे नशा आणणारे पेय असणे शक्य नाही.
ऋग्वदामध्ये सोमरसासंबंधी आणखी वर्णन आहे. एका ठिकाणी तर सोमरसाची उपलब्धता इतकी दर्शविली आहे की माणसांसोबतच गायींनाही सोमरस पोटभर दिलं जायचं. यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की आजकाल प्रचलित असलेल्या लस्सीसारखे एखादे पौष्टिक पेयपदार्थ सोमरस म्हणून प्रचलित असावे.

गुरुवार, 4 अप्रैल 2019

*अक्षता चे महत्व*

अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यांत सांगितले आहेत. म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी देवाला अक्षता वाहतात. महापूजेतील अंगपूजा, आवरणपूजा इ. पूजा अक्षता वाहूनच करतात. विविध कर्मांग देवता, पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या त्या देवतेचे आवाहन करतात. अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे.
त्या साठीचा हा मंत्र -
अक्षतास्तंडुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता: ।
मयानिवेदिता भक्त्या गृहाण परमेश्र्वर ।।
कुंकुमाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता मी तुला भक्तीने समर्पण करतो. हे परमेश्र्वरा, त्यांचे स्वीकार कर.
लग्न-मुंजीच्या प्रसंगी, वधू-वरांच्या आणि मुंजा मुलांच्या मस्तकावर अक्षता टाकतात. वधू-वरांवर अक्षता टाकण्याचीही पद्धत पुरातन आहे. अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जात असे. वधू-वरांचा विवाह संततीने सुफ़लित व्हावा, हा उद्देश त्यात आहे. याशिवाय धान्याच्या ठिकाणी भूता-खेतांचे निवारण करण्याची शक्ती असल्यामुळे वधू-वरांना भूता-खेतांची दृष्ट लागू नये, म्हणूनही त्यांच्यावर अक्षता टाकतात.
या मंगल अक्षता तांदूळ, ज्वारी इत्यादी कोणत्याही धान्यांच्या असू शकतात.
प्राचीन काळी ग्रीसमध्येही वधू-वरांवर याच कारणासाठी पीठ आणि मिठाई उधळण्याची चाल होती. प्राचीन पर्शियन विवाह समारंभातही तांदुळांना महत्त्वाचे स्थान होते. आजही पारश्यांत लग्न आणि नवज्योत या प्रसंगी अक्षता टाकण्याची पद्धत आहे. या अक्षता बळ, समृध्दी आणि दीर्घायुष्य देणाऱ्या आहेत

*हेच खरे आहे असे नाही, ही पन एक बाब आहे जी विचार करायला लावते. अनावश्यक परम्परा बदलने गैर नाही. बदल केलाच पाहिजे. पन ति बाब खरच अनावश्यक आहे है केवळ महात्मा फुले नि सांगितले म्हणून बदल करावा असे गरजेचे नाही. त्या मागील आध्यात्मिक, सामाजिक, किवा काही आणखी कारण असतील काय, यावर अभ्यास व्हयची गरज आहे असे माझे वैयक्तिक मत आहे।

कारण काही मेसेजद्वारे हिन्दू परम्परावर विरोधाभासी विचार सेक्युलर लोक मीडिया वर पसरवतात.. आपन त्याला बिंदास्त फोरवर्ड करतो..

जसे
गणेश मूर्ति मुळे पानी प्रदूषित होते
*(नद्या मधे त्यापेक्षा हजार पट प्रदूषण अनेक कंपन्या रोज करतात)*

महाशिवरात्रि आणि श्रावण महिन्यात पिंडी वर दूध ताकने चूक आहे, त्ये गरीब मुलाना वाटावे ऐसे मेसेज सुरु होतात
*(मग इफ्तार पार्टित कित्येक टन अन्न वाया जाते, त्यावर का कोणी बॉलत नई, 25 डिसेम्बर ला चर्च आणि घरावर ज्या मेनबत्या लावतात त्या पेक्षा गरीबात का वाटत नाहीत)*

आपण लग्नात अक्षता वापरतो. अक्षता फक्त तांदूळाच्याच बनवतात. दुसरे कोणतेही धान्य त्यासाठी वापरले जात नाही.

याची खालील दोन महत्वाची कारणे-

तांदूळ हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही…त्याला आतून कीड पडत नाही…म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला  धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते !

दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते…तेव्हा ते खरे बहरते…..! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे….पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते….यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ….असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात….

आपल्याकड़च्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत….

अशा हजारो गोष्टी आहेत
पन आम्ही हिन्दू स्वतः होऊन आधी कुणाला त्याच्या परम्परा आणि धर्मावर टीका करून दुखवत नाही. या चुका फक्त हिन्दू धर्मातील शोधून सांगायला सुरुवातच सेक्युलर लोकांनी सुरु केलेले आहे. परम्परा तोडल्या की आपोआप हिन्दू च्या धार्मिक शिडी मधील एक पायरी कमी होते.

आजही दक्षिण भारतात मोहरी आणि मीठ कुणीही कुणाला हातात देत नाहीत। जमिनीवर ठेवतात।
मि यावर चौकशी आणि वाचन केले तर समजले की या दोन वस्तु  देता घेताना  मोठ्या प्रमाणात bad एनर्जी ची देवान घेवान करतात (ट्रांसफर करतात) म्हणुन सरळ एका हाताने दुसऱ्या हातात देने गैर असते। हा नियम दक्षिण मधे सुशिक्षित अशिक्षित सगळेच पाळतात, मग ते हिन्दू असो किवा नसों।

मग अक्षता बाबत या लेवल वर वाचन चर्चा अभ्यास व्हावा, मग मेसेज वायरल व्हावा, ही अपेक्षा.

बुधवार, 27 फ़रवरी 2019

ज्याची जेवढी कूवत

*ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार....*

आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं,"ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?"

"होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं.

"गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल."

"अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?"

"ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल."

"ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?"

"मिरजलाच घेऊन जावी लागेल."

त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पुढारी माझ्या दारात.
"डॉक्टर, गाडी बँकेनं ओढून नेली होय?" त्यानं विचारलं.

"कोण म्हटलं?"

"नाही, गावात कोणतरी म्हणत होतं."

तासाभरात दुसरा मनुष्य. "डॉक्टर, किती हप्ते तटले होते हो?...हप्ते भरता येत नव्हते तर गाडीच घ्यायची नव्हती !"

असेच मग दिवसभर लोक येत राहिले आणि प्रश्न विचारत राहिले.

दिवसभरात एकानंही," गाडीला काय झालं?" किंवा "गाडी कुठं गेली?" म्हणून विचारलं नाही. सगळे जण असे बोलत होते की जणू गाडी बँकेनंच ओढून नेलीय.

मला सकाळी सकाळी या प्रश्नांचा राग आला होता पण नंतर नंतर लोकांच्या हलक्या कानाचं आणि सुमार बुद्धीचं हसू यायला लागलं.

दुपारनंतर तर आमचा संवाद असा होऊ लागला,

"डॉक्टर, बँकेनं गाडी ओढून नेली होय ?"

"होय."

"का?"

"इंजिनच्या कामासाठी आणि ऑइल बदलीसाठी."

"पण गाडी बँकेनं का नेली ?...मेस्त्रीनं न्यायला पाहिजे होती नव्हं?"

"आजकाल असंच असतं," मी गंभीरपणे म्हणायचो, "बँकेच्या कर्जवसुलीची कामं मेस्त्री करतात आणि गाड्या दुरुस्तीची कामं बँकवाले करतात."

"असं का म्हणे?"

"काय माहीत?....पण सध्या असंच चाललेलं असतं !" मी आणखी गंभीर होऊन बोलायचो.
माझं नाटक बघून बायको हसायची आणि मग समोरचा माणूस खजिल होऊन निघून जायचा.

त्या एका प्रसंगानं मला शिकवलं की लोक काय म्हणतात तिकडं कधीच लक्ष द्यायचं नाही. लोक काहीही बोलत असतात.

मध्यंतरी तर कमालच झाली. माझ्याकडं एक डॉक्टर मुलगी कामाला आली. तिला गाडीत बसलं की मळमळायचं. म्हणून ती पुढं माझ्याशेजारी बसायची.

लोक म्हणायचे, 'डॉक्टरनं दुसरं लग्न केलं वाटतं !' एक जण माझ्या खऱ्या बायकोला म्हणालीही,

"स्नेहा,खरंच भाऊजींनी दुसरं लग्न केलं होय गं ?" माझी बायको हजरजबाबी,बोलली,

"अगो बाई, तुम्हांला लग्नाला सांगायचंच राहिलं की !" काही दिवसांनी ती मुलगी काम सोडून गेली.

लोक म्हणाले, 'डॉक्टरची दुसरी बायको डॉक्टरला सोडून गेली वाटतं !'

तोपर्यंत दुसरी मुलगी कामावर आली. लोक म्हणाले,
'आयला,डॉक्टरचं काही खरं दिसत नाही. दुसरी बायको गेली नाही तोपर्यंत तिसरी आणली.'

माझ्या कानावर अशा बातम्या आल्या की मी पूर्वी पूर्वी खूप अस्वस्थ व्हायचो पण आता हे सगळं एन्जॉय करत असतो....

लोक काय,काहीही बोलत असतात पण आपण आपलं काम करत जायचं..... कुणावरही न रागावता न चिडता.

*```_*ज्याची जेवढी कुवत तेवढा त्याचा विचार....!!*_```*