अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यांत सांगितले आहेत. म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी देवाला अक्षता वाहतात. महापूजेतील अंगपूजा, आवरणपूजा इ. पूजा अक्षता वाहूनच करतात. विविध कर्मांग देवता, पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या त्या देवतेचे आवाहन करतात. अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे.
त्या साठीचा हा मंत्र -
अक्षतास्तंडुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता: ।
मयानिवेदिता भक्त्या गृहाण परमेश्र्वर ।।
कुंकुमाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता मी तुला भक्तीने समर्पण करतो. हे परमेश्र्वरा, त्यांचे स्वीकार कर.
लग्न-मुंजीच्या प्रसंगी, वधू-वरांच्या आणि मुंजा मुलांच्या मस्तकावर अक्षता टाकतात. वधू-वरांवर अक्षता टाकण्याचीही पद्धत पुरातन आहे. अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जात असे. वधू-वरांचा विवाह संततीने सुफ़लित व्हावा, हा उद्देश त्यात आहे. याशिवाय धान्याच्या ठिकाणी भूता-खेतांचे निवारण करण्याची शक्ती असल्यामुळे वधू-वरांना भूता-खेतांची दृष्ट लागू नये, म्हणूनही त्यांच्यावर अक्षता टाकतात.
या मंगल अक्षता तांदूळ, ज्वारी इत्यादी कोणत्याही धान्यांच्या असू शकतात.
प्राचीन काळी ग्रीसमध्येही वधू-वरांवर याच कारणासाठी पीठ आणि मिठाई उधळण्याची चाल होती. प्राचीन पर्शियन विवाह समारंभातही तांदुळांना महत्त्वाचे स्थान होते. आजही पारश्यांत लग्न आणि नवज्योत या प्रसंगी अक्षता टाकण्याची पद्धत आहे. या अक्षता बळ, समृध्दी आणि दीर्घायुष्य देणाऱ्या आहेत
*हेच खरे आहे असे नाही, ही पन एक बाब आहे जी विचार करायला लावते. अनावश्यक परम्परा बदलने गैर नाही. बदल केलाच पाहिजे. पन ति बाब खरच अनावश्यक आहे है केवळ महात्मा फुले नि सांगितले म्हणून बदल करावा असे गरजेचे नाही. त्या मागील आध्यात्मिक, सामाजिक, किवा काही आणखी कारण असतील काय, यावर अभ्यास व्हयची गरज आहे असे माझे वैयक्तिक मत आहे।
कारण काही मेसेजद्वारे हिन्दू परम्परावर विरोधाभासी विचार सेक्युलर लोक मीडिया वर पसरवतात.. आपन त्याला बिंदास्त फोरवर्ड करतो..
जसे
गणेश मूर्ति मुळे पानी प्रदूषित होते
*(नद्या मधे त्यापेक्षा हजार पट प्रदूषण अनेक कंपन्या रोज करतात)*
महाशिवरात्रि आणि श्रावण महिन्यात पिंडी वर दूध ताकने चूक आहे, त्ये गरीब मुलाना वाटावे ऐसे मेसेज सुरु होतात
*(मग इफ्तार पार्टित कित्येक टन अन्न वाया जाते, त्यावर का कोणी बॉलत नई, 25 डिसेम्बर ला चर्च आणि घरावर ज्या मेनबत्या लावतात त्या पेक्षा गरीबात का वाटत नाहीत)*
आपण लग्नात अक्षता वापरतो. अक्षता फक्त तांदूळाच्याच बनवतात. दुसरे कोणतेही धान्य त्यासाठी वापरले जात नाही.
याची खालील दोन महत्वाची कारणे-
तांदूळ हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही…त्याला आतून कीड पडत नाही…म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते !
दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते…तेव्हा ते खरे बहरते…..! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे….पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते….यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ….असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात….
आपल्याकड़च्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत….
अशा हजारो गोष्टी आहेत
पन आम्ही हिन्दू स्वतः होऊन आधी कुणाला त्याच्या परम्परा आणि धर्मावर टीका करून दुखवत नाही. या चुका फक्त हिन्दू धर्मातील शोधून सांगायला सुरुवातच सेक्युलर लोकांनी सुरु केलेले आहे. परम्परा तोडल्या की आपोआप हिन्दू च्या धार्मिक शिडी मधील एक पायरी कमी होते.
आजही दक्षिण भारतात मोहरी आणि मीठ कुणीही कुणाला हातात देत नाहीत। जमिनीवर ठेवतात।
मि यावर चौकशी आणि वाचन केले तर समजले की या दोन वस्तु देता घेताना मोठ्या प्रमाणात bad एनर्जी ची देवान घेवान करतात (ट्रांसफर करतात) म्हणुन सरळ एका हाताने दुसऱ्या हातात देने गैर असते। हा नियम दक्षिण मधे सुशिक्षित अशिक्षित सगळेच पाळतात, मग ते हिन्दू असो किवा नसों।
मग अक्षता बाबत या लेवल वर वाचन चर्चा अभ्यास व्हावा, मग मेसेज वायरल व्हावा, ही अपेक्षा.