सद्गुरु लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
सद्गुरु लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

रविवार, 10 जून 2018

सद्गुरु

[10/06, 1:49 PM] Vaishnav Maharaj: सद्गुरु वांचोनि सापडेना सोय
धरावे ते पाय आधी आधी
आपना सारिखे करिती तात्काळ
नाही काळ वेळ तया लागी
लोह परिसा ची न साहे उपमा
सद्गुरु महिमा अगाधची
तुका म्हणे कैसे आंधलें है जन
गेले विसरून खऱ्या देवा
[10/06, 1:52 PM] Vaishnav Maharaj: दु:खाने जर्जर झालेल्या संसारी जीवाच्या चित्तात शांती व आनंदाची अमृतधारा सिंचन करण्यासाठीच श्री सद्गुरूंची आवश्यकता आहे. आनंद प्राप्त करून घेतला तर जगात सर्वत्र आनंदाचाच अनुभव येईल आणि हेच ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूंकडे जायचे असते
[10/06, 1:53 PM] Vaishnav Maharaj: संसाररूपी चिखलाच्या डबक्यात रात्रंदिवस बुडलेला जीव असतो, त्यातून वर येण्याची त्याची इच्छा आहे, परंतु अंगात साहस व शक्ती कमी आहे. चित्तात ज्ञानसूर्याचा उदय करून नित्यानंदमय सुख-दु:खरहित ब्रह्मस्वरूपात जीवाला चिरकाल प्रस्थापित करील, तर सद्गुरूरूप भगवत्शक्तीच्या विकासकेंद्राचे काय प्रयोजन आहे, असा प्रश्नच मनात उठणार नाही.
गुरु तेथे ज्ञान। ज्ञानी आत्मदर्शन।।
दर्शनी समाधान। आधी जैसे।।
[10/06, 1:56 PM] Vaishnav Maharaj: गुरुविषयी इतक प्रेम पाहिजे की त्यांची आठवण येताच डोळे बन्द व्हावेत, भरून याव, त्यानी आपल मानल, जवळ घेतला म्हणून धन्य व्हाव, चित्त स्थिर होऊन समाधि कड़े वाटचाल व्हावी.
[10/06, 2:01 PM] Vaishnav Maharaj: गुरूचे आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणे हे होय. हे मार्गदर्शन घेऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरूचे पाय धरावयाचे असतात. परमार्थात श्रवण व सद्गुरू यांना फार महत्त्व आहे. सद्गुरूंशिवाय गती नाही, तर श्रवण हा परमार्थाचा पायाच आहे. सद्गुरू मुखातून शुद्ध श्रवण घडल्याशिवाय साधकाच्या अंत:करणात नामाची गोडी निर्माणच होत नाही.
‘आर्धा देवासी ओळखावे। मग तयांचे भजन करावे।
अखंड ध्यानाचे धरावे। पुरुषोत्तमाचे।।’
तात्पर्य सद्गुरूच्या मुखातून जे शुद्ध श्रवण घडते, त्याने साधकाला ज्ञान मिळते व देवाची ओळख होते. म्हणूनच एकनाथ महाराज सांगतात,
*‘सद्गुरू वाचोनि नाम न ये हातां। साधने साधिता कोटि जाणा।।*

शरणागति पाहिजे, हुशारी नाही. जे स्वतः आंकड़े मोड़ करायला लागतात, गुरुबाबत अंदाज बाँधायला लागतात, त्याची शरणागति कधीच होत नाही.  आपले भांडे रिकामें असल्या शिवाय त्यात उपदेश शिरतच नाही. बोध होत नांही. बोधा शिवाय काही च प्राप्त होत नाही.

*संतांसी शरण गेलिया वांचोनी। एका जनार्दनी न कळे नाम।।’*
म्हणून श्री सद्गुरूंना आपण शरण गेल्यावर ते प्रथम आपल्याला जागे करतात व नंतर आपल्या जवळच असलेल्या देवाची जागा प्रत्यक्ष दाखवितात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,
‘तुका करी जागा। नको चाचपू वाऊगा।।
आहेसी तु अगां। अंगी डोळे उघडी।।’

रविवार, 8 जनवरी 2017

खरे सद्गुरु ओळखा

खरे सदगुरु ओळखण्याची खूण काय ?

खरे सदगुरु ओळखावयाचा कसा हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो , या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे नाही. आजकाल गुरुकडे धावणारे लोक , त्यांचा फक्त पोशाख व बाह्य प्रकार पाहतात . कपाळावर व अंगावर भस्माचे पट्टे , भगवे वस्त्र, दाढी - जटा वगैरे बाह्य प्रकार करणारे साधू - संत, बुवा - बाबा म्हणून ओळखले जातात .
यांच्याचपैकी कुणी तथाकथित चमत्कार करणारे किंवा जगावेगळे प्रकार करणारे असतील तर त्यांच्याकडे लोकांच्या झुंडीच्या झुंडी धावतात. वास्तविक बाह्य पोषाख , वेष , देव - देवस्की व चमत्कार यांचा शुध्द परमार्थाशी कांहीच संबंध नसतो . किंबहुना ज्यांच्याजवळ शुध्द परमार्थ असतो ते या सर्व भानगडीत पडत नाहीत. याचा अर्थ असा नव्हे की , दाढी - जटा वाढविणाऱ्यांत किंवा भगवे वस्त्र परिधान करणाऱ्यात काहीजण संत नसतात.  सदगुरु ओळखण्याची सामान्य कसोटी खालीलप्रमाणे सांगता येईल
१) ते निरपेक्ष असतात ;
२) ते आत्मज्ञानी असतात ;
३) साधकांचा उध्दार करण्याची जीवनात विचारात बदल करण्याची त्यांच्या जवळ तीव्र तळमळ असते .
४) साधकांसाठी ते सदैव आपला देह चंदना सारखा झिजवितात ;
५) साधकांना दिव्यबोध व दिव्य साधना शिकविण्याचे अतुल सामर्थ्य त्यांच्याजवळ असते . अर्थात हेही लक्षात ठेवले पाहिजे की , अशा प्रकारचे सदगुरु भेटणे ही कांही
सामान्य गोष्ट नाही . आपले भाग्य उजळते तेव्हाच असे सदगुरु भेटतात .

उजळले भाग्य आतां  अवघी चिंता वारली
संत दर्शने हा लाभ  पद्मनाभ जोडिला...