☆☆☆☆☆☆
गुरू स्वत्वाची जाण
गुरू श्रध्देचे स्थान
गुरू असे महान
सकल जगी II
गुरू कैवल्य चांदण
गुरू मुक्तीचे साधन
गुरू जीवन सांधणं
जाणताहे II
गुरू सामर्थ्य चित्ती
गुरू तेजाची प्रचिती
गुरू चैतन्याची सृष्टी
निर्मिताहे II
गुरूवाणी साखर
गुरू मायेची पाखर
गुरू ज्ञानाचा सागर
अथांग आहे II
एकलव्याची शिष्यता
तीरकमानी एकाग्रता
त्याची गुरूठायी आस्था
ज्ञात आहे II
गुरूविण नाही भेद
गुरूविण नाही बोध
गुरूविण नाही शोध
ईश्वराचा II
ऐसी गुरूंचिये लक्षणे
पुन्हा न लगे सांगणे
म्हणोनि गुरूंचिये चरणे
लोटांगण !!
॥श्री गुरुदेव दत्त॥
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें