रविवार, 8 जनवरी 2017

खरे सद्गुरु ओळखा

खरे सदगुरु ओळखण्याची खूण काय ?

खरे सदगुरु ओळखावयाचा कसा हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो , या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे नाही. आजकाल गुरुकडे धावणारे लोक , त्यांचा फक्त पोशाख व बाह्य प्रकार पाहतात . कपाळावर व अंगावर भस्माचे पट्टे , भगवे वस्त्र, दाढी - जटा वगैरे बाह्य प्रकार करणारे साधू - संत, बुवा - बाबा म्हणून ओळखले जातात .
यांच्याचपैकी कुणी तथाकथित चमत्कार करणारे किंवा जगावेगळे प्रकार करणारे असतील तर त्यांच्याकडे लोकांच्या झुंडीच्या झुंडी धावतात. वास्तविक बाह्य पोषाख , वेष , देव - देवस्की व चमत्कार यांचा शुध्द परमार्थाशी कांहीच संबंध नसतो . किंबहुना ज्यांच्याजवळ शुध्द परमार्थ असतो ते या सर्व भानगडीत पडत नाहीत. याचा अर्थ असा नव्हे की , दाढी - जटा वाढविणाऱ्यांत किंवा भगवे वस्त्र परिधान करणाऱ्यात काहीजण संत नसतात.  सदगुरु ओळखण्याची सामान्य कसोटी खालीलप्रमाणे सांगता येईल
१) ते निरपेक्ष असतात ;
२) ते आत्मज्ञानी असतात ;
३) साधकांचा उध्दार करण्याची जीवनात विचारात बदल करण्याची त्यांच्या जवळ तीव्र तळमळ असते .
४) साधकांसाठी ते सदैव आपला देह चंदना सारखा झिजवितात ;
५) साधकांना दिव्यबोध व दिव्य साधना शिकविण्याचे अतुल सामर्थ्य त्यांच्याजवळ असते . अर्थात हेही लक्षात ठेवले पाहिजे की , अशा प्रकारचे सदगुरु भेटणे ही कांही
सामान्य गोष्ट नाही . आपले भाग्य उजळते तेव्हाच असे सदगुरु भेटतात .

उजळले भाग्य आतां  अवघी चिंता वारली
संत दर्शने हा लाभ  पद्मनाभ जोडिला...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें